विज्ञानाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही व्यक्तीची उंची त्याच्या पालकांच्या आहारावर आणि शरीरातील हार्मोनलच्या बदलांवर अवलंबून असते.
लटकण्याचा सराव केल्याने शरीर लवचिक होते आणि शरीराचा विकासही चांगला होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते 10 ते 11 वर्षे वयापर्यंत हँगिंग एक्सरसाइज केल्याने शारीरिक स्थिती सुधारते, याशिवाय उंची वाढवण्यास मदत होते.
खूप जण वाकून चालतात ज्यामुळे त्यांची उंची कमी दिसते, अशांनी लटकण्याचा व्यायाम केला तर त्यांच्या शरीर पॉश्चरमध्ये येते ज्यामुळे ते उंच दिसू लागतात.
कुटुंबातील प्रत्येकजण उंच असेल तर मुलंही उंच होतात. मात्र, पालकांपैकी एकाची उंची कमी असेल तर तुमची उंची कमी असू शकते.
संतुलित आहार, हार्मोनल बदल, योग्य पोषणद्रव्ये मिळणे यामुळेही उंचीत फरक पडतो.
अनेकदा काही आजारामुळेही उंची न वाढण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे उंची वाढण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम गरजेचा आहे.
तुम्ही जर व्यायम करताना लटकत असाल तर ते आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
फक्त लटकल्याने उंची वाढतेच असं म्हणणे योग्य ठरणार नाही.