Madhuri Dixit: माधुरीला नाही म्हणायचं नसतं!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये ऑल टाईम ग्रेट अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षितच्या नावाचा समावेश केल्याशिवाय चाहत्यांचे समाधान होणार नाही.

तब्बल तीन दशकांहून अधिक काळ माधुरीनं आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू प्रेक्षकांच्या मनावर केली आहे.

आजही बॉलीवूडमधील ज्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत त्यातील बऱ्याचशा अभिनेत्रींची आयडल माधुरी आहे.

सध्या झलक दिखला जा च्या मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी झाली आहे. तिनंही आपण माधुरीला पाहून डान्स शिकलो अशी प्रांजळ कबूली दिली होती.

माधुरी आता वेगवेगळ्या रियॅलिटीज शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसते.

माधुरीच्या फोटोंना आणि हटक्या व्हिडिओला चाहत्यांचा आणि नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो.

सध्या माधुरीनं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत ते चाहत्यांना खूप आवडले आहेत.

माधुरीच्या त्या फोटोंवर प्रतिक्रिया देताना चाहत्यांच्या कल्पनेला धुमारे फुटले आहेत. कित्येकांनी आपल्या आवडत्या अभिनेत्रीवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit