धक धक गर्ल ने वाढवली काळजाची धक धक

| Sakal

माधुरी दिक्षित आता सिनेमात पहिल्यासारखी सक्रिय नसली तरी तिच्या सौंदर्यांवर भुलणाऱ्यांची संख्या मात्र दिवसें-दिवस वाढताना दिसते आहे.

| Sakal

वयाच्या पन्नाशीतही चेहऱ्यावरचं हास्य तसूभरही कमी होऊ न देता माधुरी आजही आपल्या हास्यानं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते.

| Sakal

माधुरीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या गुलाबी रंगाच्या पेहरावात ती भलतीच सुंदर दिसत आहे.

| Sakal

माधुरीनं फोटो शेअर केले अन् कमेंट्सचा वर्षाव न झाला तर नवल म्हणावे लागेल.

| Sakal

माधुरी सध्या तिच्या 'मजा मा' या वेबसिरीजमुळे भलतीच चर्चेत पहायला मिळते.

| Sakal

मनिष मल्होत्राच्या पार्टीत पोहोचलेल्या माधुरीनं पुन्हा एकदा आपल्या सौंदर्यानं सगळ्यांचा नजरा स्वतःकडे वेधून घेतल्या.

| Sakal

माधुरीनं काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात ओटीटी प्लॅटफॉर्मचं स्वागत करत म्हटलं होतं,''आता कुठे जाऊन कलाकारांना आपल्या आवडीची व्यक्तिरेखा निवडायची मुभा मिळाली आहे''.

| Sakal