महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने सध्या पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.
या सोहळ्याला राज्यभरातल्या तमाम कुस्तीप्रेमींनी हजेरी लावली.
कुस्ती प्रेमींचा प्रतिसाद आणि पैलवानांच्या दर्जेदार खेळाने ही स्पर्धा चांगलीच गाजली.
महिलांनीही हा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
पैलवान सिकंदर शेख, माऊली जमदाडे, महेंद्र गायकवाड, विशाल बनकर या पैलवानांचे खेळ विशेष गाजले.
कुस्तीतले हे डावपेच आणि त्यामुळे गाजलेली स्पर्धा डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरली.
कडाक्याची थंडीसुद्धा या चुरशीच्या सामन्यांमधला थरार कमी करू शकली नाही.
प्रत्येक सामन्यामध्ये चाहत्यांची उत्सुकता प्रचंड ताणली जात होती.
कुस्तीचा थरार कसा असतो, हे दाखवून देणाऱा प्रत्येक सामना ठरला.
अंगावर अक्षरशः रोमांच उभ्या करणाऱ्या या स्पर्धेतली क्षणचित्रे आयोजक मुरलीधर मोहोळ यांनी शेअर केली आहेत.
हे सामने पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यंदाचं हे ६५ वं वर्ष आहे.
परंपरेप्रमाणे चांदीची गदा तसंच यंदा पैलवानांना थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.