Sudesh
सध्या जगभरात एआयची चर्चा सुरू आहे. ओपन एआय कंपनीने चॅटजीपीटी हा चॅटबॉट लाँच केल्यापासून लोक कित्येक कामांसाठी याचा वापर करत आहेत.
एआय चॅटबॉट तयार करण्यासाठी साधारणपणे कोडिंग शिकण्याची आणि त्यामध्ये एक्सपर्ट होण्याची गरज असते.
मात्र आता चॅटजीपीटीच्या मदतीने तुम्ही अगदी आरामात स्वतःचा एआय चॅटबॉट बनवू शकणार आहात. यासाठी कंपनीने GPT Builder नावाचं एक खास टूल लाँच केलं आहे.
जीपीटी बिल्डर या टूलमध्ये यूजर्स केवळ काही कमांड्स देऊन आपल्याला हवा तसा चॅटबॉट बनवून घेऊ शकतील. ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी याबाबत माहिती दिली.
या मदतीने तुम्ही मार्केटिंग GPT, ट्रॅव्हल गाईड GPT, एखादा विषय शिकवणारा चॅटबॉट किंवा अगदी एआय चॅटबॉट गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड देखील तयार करू शकाल.
आपला चॅटबॉट तयार केल्यानंतर यूजर्स त्या माध्यमातून पैसे देखील कमावू शकणार आहेत. यासाठी कंपनी देखील मदत करेल.
ओपन एआय या महिन्यात GPT स्टोअर लाँच करणार आहे. या स्टोअरवर यूजर्सने तयार केलेले चॅटबॉट उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यातून मिळणारे पैसे कंपनी क्रिएटर्ससोबत शेअर करणार आहे.
सध्या हे फीचर केवळ जीपीटी प्लस यूजर्ससाठी उपलब्ध आहे. फ्री यूजर्सना याचा पर्याय मिळणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.