Mangalsutra Ritual : मंगळसूत्र घालण्याची प्रथा कधी सुरू झाली?

सकाळ डिजिटल टीम

लग्नात मंगळसूत्राला सर्वाधिक महत्व आहे. पण ही प्रथा सुरू झाली कशी?

Mangalsutra Ritual | esakal

हल्ली मुली आपल्या आवडीच्या डिझाइनचे मंगळसूत्र बनवतात. पण आधी ते कसे होते?

Mangalsutra Ritual | esakal

आधी मंगळसूत्र म्हणजे साध्या दोऱ्यात काचेच्या काळ्या मण्यांमध्ये दोन सोन्याचे मणी आणि दोन वाट्या असे स्वरुप होते.

Mangalsutra Ritual | esakal

लग्नाच्या वेळी नवरा मुलगा पत्नीच्या गळ्यात हा दागिना घालतो. पण हा फक्त दागिना नसून स्त्रियांसाठी हे तिचे स्त्रीधन असते.

Mangalsutra Ritual | esakal

मंगळसूत्रालाच 'गाठले', 'डोरले', 'गुंठण' असेही शब्द ग्रामीण भागात रूढ आहेत. 

Mangalsutra Ritual | esakal

डोरलं हा मंळसूत्राचाच प्रकार आहे. हा सोन्यापासून नक्षीकाम केलेला गोलाकार मण्यांचा दागिना असतो.

Mangalsutra Ritual | esakal

मंगळसूत्र हा प्रकार दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आला असावा असं बोललं जातं.

Mangalsutra Ritual | esakal

तामिळनाडू व केरळ या प्रदेशात 'ताळी' नावाचा एक सौभाग्य अलंकार वधूच्या गळ्यात बांधण्याची प्रथा आहे. त्यावरूनच 'मंगळसूत्र' बांधण्याची प्रथा सुरू झाली असावी.

Mangalsutra Ritual | esakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mangalsutra Ritual | esakal