प्रणाली मोरे
अभिनेत्री मानसी नाईक सध्या पती प्रदीप खरेरा सोबत घटस्फोट घेत असल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे.
मानसी नाईकनं नुकतेच इन्स्टाग्रामवरील नवऱ्यासोबतचे सगळे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत.
मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून काही अशा पोस्ट करताना दिसत आहे,ज्यातून आपलं प्रदीपशी असलेलं नात तुटल्याचं जणू ती सांगत आहे असं वाटत राहतं.
मानसी कधी एखाद्या कवितेच्या माध्यमातून तर कधी एखाद्या विचाराच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे.
मानसी नाईकच्या संभ्रमात टाकणाऱ्या पोस्टमुळे आता नेटकरी देखील तिला प्रश्न करू लागलेयत की,'तू खरंच घटस्फोट घेतेयस का?'
मानसीनं बॉक्सिंग पट्टू प्रदीप खरेरासोबत जानेवारी,२०२१ मध्ये लग्न केलं होतं. आणि लग्नानंतर दीड वर्षातच त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातमीनं चाहते मात्र चिंतेत पडलेयत.
मानसी नाईकनं तिच्या एका पोस्टमध्ये लिहिलंय, I was raised In A Family
Where Women Made It Happen...With or without a Man 🤍.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.