केतकी एक उत्तम सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह गायिका सुद्धा आहे.
नागपूरात जन्मलेली केतकी ही सुप्रसिद्ध गायक पराग आणि गायिका सुवर्णा माटेगावकर यांची लेक आहे.
तिने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.
शाळा, तानी, रंगकर्मी, टाईमपास, फुंतरू, इश्कवाला लव्ह, फोटोकॉपी, भातुकली, काकस्पर्श आनंदी गोपाळ सारख्या अनेक चित्रपटात तिने काम केले.
तिच्या आवाजासोबत तिच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी उचलून धरले.
केतकी माटेगावकरने अभिनय आणि गायन अशा दोन्हीही क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे.
तरुणांमध्येही तिची प्रचंड मोठी क्रेझ आहे.
ती सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते.