अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगे हिने कायमच आपल्या लावणीने सर्वांना घायाळ केले आहे.
अगदी बिग बॉसच्या घरातही तिने आपला खेळ दाखवत चाहत्यांचे मनोरंजन केले.
मेघाला नुकतेच कोकणकन्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिवजन्मोत्सवा निमित्त तिला मीरा भाईंदर येथील कोकण सेवा संस्थेच्या वतीने'कोकणरत्न पुरस्कार सोहळा २०२३' प्रदान करण्यात आला.
नुकतेच मेघाने हे फोटो शेयर करत सर्वांना ही आनंदाची बातमी दिली.
मेघाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे.