मिथीला पालकर सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली अन् त्यानंतर ती आता अनेक वेब सीरीज आणि चित्रपटांमध्ये झळकली आहे.
लिटल थिंग्ज या वेबसीरीज मधील तिच्या सालस अभिनयाची सगळ्यांनाच भुरळ पडली होती.
मिथीला तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सतत नवनवे फोटो व्हिडीओ शेअर करत असते.
हिंदी, मराठी नंतर मिथीला आता दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील झळकू लागली आहे.
दक्षिणात्या चित्रपटातील स्टार दुलकर सलमान आणि इरफान यांच्यासोबत कारवा या तिच्या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळालं.
इंस्टाग्रामवर मिथीला तिचे गातानाचे व्हिडीओ देखील शेअर करत असते.
मिथीला वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये देखील गाणी गाते.