महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार कोणते; जाणून घ्या

| Sakal

बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार 1 लाख 63 हजार 429 मताधिक्यानं विजयी झाले. त्यांनी भाजप उमेदवार गोपीचंद पडळकरांचं डिपॉझिट जप्त केलंय.

| Sakal

काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी पलूस कडेगाव मतदारसंघातून 1 लाख 62 हजार 521 असं भरघोस मताधिक्य मिळवलंय.

| Sakal

मुरबाड मतदार संघातून भाजपचे किसन कथोरे 1 लाख 37 हजार 336 मतांनी विजयी झालेत. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव यांचा पराभव केलाय.

| Sakal

लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांनी विजय मिळालाय. धीरज देशमुख 1 लाख 19 हजार 826 एवढ्या विक्रमी मतांनी विजयी झालेत.

| Sakal

परभणीतून शिवसेना उमेदवार राहुल पाटील यांनी 80 हजाराहून अधिक मताधिक्य मिळवत विक्रमी विजय मिळविला. त्यांना 1 लाख 3 हजार मतं मिळाली.

| Sakal

भोसरी विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार महेश लांडगे 77 हजार 279 मतांनी विजयी झालेत.

| Sakal

नंदुरबारमधून भाजप उमेदवार डॉ. विजयकुमार गावित विक्रमी मतांनी  विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार उदेसिंग पाडवी यांचा 70 हजार 650 मतांनी पराभव केला. 

| Sakal

माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे सहाव्यांदा विजयी झालेत. बबनराव शिंदे 68 हजार 549 विक्रमी मताधिक्यांनी विजयी झालेत. त्यांना 1 लाख 41 हजार 701 मते मिळालीत. 

| Sakal