लष्कराचा झटका! न्यूड फोटो प्रकरणी मॉडेलला 6 वर्षांची शिक्षा

सकाळ डिजिटल टीम

अभिनय क्षेत्रातील अनेक मॉडेल्स त्याचे फोटो शूट करत असतात. मात्र, त्यातील एका मॉडेलला हे फोटो शूट करणं चांगलंच महागात पडलं आहे.

न्यूड फोटो शूट केल्याप्रकरणी एका मॉडेलला थोडी थोडकी नव्हे तर, सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यूड फोटो शूट केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

म्यानमारची रहिवाशी असणाऱ्या या मॉडेलचे नाव आहे Nang Mwe San असे आहे.

Nang Mwe San ने डॉक्टर ते मॉडेल असा प्रवास केला आहे.

Nang वर देशाची संस्कती आणि आत्मसन्मान दुखावल्याचा आरोप आहे.

Nang ही म्यांमारची पहिली अशी व्यक्ती आहे जिच्यावर इलेक्ट्रॉनिक्स ट्रान्झझेंक्शन लॉ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

म्यांमारमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आलेला आहे.

लष्काराच्या कोर्टाने Nang ला ही शिक्षा सुनावली आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये Nang ने लष्कराच्या विरोधात स्वतःचे फोटो शेअर केले होते.

तेव्हापासून Nang लष्काराच्या रडावर होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.