पावसाळ्यात मुलांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने चिकनगुनिया, डेंग्यू, विषाणूजन्य ताप सहज होतो.
सध्या नुसता पावसाळा नसून कोरोनाची साथ आहे. दुहेरी त्रासापासून मुलांचे संरक्षण करणे अधिक महत्त्वाच आहे.
मुलांच्या आहारात दही, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी व झिंकचा समावेश करा.
लसूण हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. लसूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
मुलांना कारले आवडत नाही; पण, त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. रक्त शुद्ध करते आणि संसर्गाचा धोका कमी करते.
टोफूमध्ये प्रथिने (प्रोटीन्स) मुबलक प्रमाणात असल्याने त्याचे सेवन मुलांसाठी फायदेशीर ठरते.
लिची, डाळिंबचे सेवन केल्याने मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले राहते.
मुलांना हळदीचे दूध पाजल्याने त्यांची प्रतिकारशक्ती वाढते.
मुलांना जंक फूडपासून दूर ठेवा. मुलांना तेलकट पदार्थही कमी द्या. याच्या सेवणाने आरोग्य बिघडते. (टीप - वरील माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या)
हेल्थ संबंधित बातम्या वाचण्यासाठी Esakal.com वर क्लिक करा