उदयनराजेंनी केलं केरळच्या पोराचं कौतुक; कारण जाणून तुम्हालाही अभिमान वाटेल!

| Sakal

सातारा : महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची भटकंती करणारा केरळचा युवक हमरास एम. के. याचं साताऱ्यात स्वागत करण्यात आलं.

| Sakal

केरळ येथील युवक हमरास हा गेली आठ महिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं प्रेरित होवून सायकलवरुन गडकोटांना 370 किल्ल्यांना भेट देत आहे.

| Sakal

यापुढील गडकिल्ल्यांच्या प्रवासासाठी हमरासला जलमंदिर पॅलेस इथं खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली.

| Sakal

हमरासनं आतापर्यंत महाराष्ट्रातील 117 किल्ल्यांना भेट दिली असून 118 किल्ल्यांना भेट देणार आहे.

| Sakal

गेली चार दिवस हमरास साताऱ्यात आहे. साताऱ्यातील अजिंक्यतारा व सज्जनगड इथंही त्यानं भेट दिली आहे.

| Sakal

यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी विशेष सहकार्य केलं.

| Sakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असलेली भक्ती पाहून हमरासचं उदयनराजेंनी विशेष कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

| Sakal