'सीता रामम' सिनेमामुळे सध्या मृणाल ठाकूर भलतीच चर्चेत आहे. सिनेमाची प्रशंसा होतेच आहे पण मृणालच्या अभिनयाचे देखील कौतूक होताना दिसते आहे.
शाहिद कपूरचा 'जर्सी', फरहान अख्तरचा 'तुफान','घोस्ट स्टोरीज','बाटला हाऊस',हृतिकचा 'सुपर 30' अशा अनेक सिनेमातून मृणालनं काम केलं आहे.
मृणाल ठाकूर आपल्या बिनधास्त वागण्यामुळे नेहमीच चर्चेत येते. सध्या सोशल मीडियावर मृणालचे काही फोटो लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
मृणालनं शेअर केलेल्या फोटोतून ती किलर पोझ देताना दिसत आहे.
या फोटोत मृणालने सिल्व्हर रंगाचा वन पीस ड्रेस घातला आहे,ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे.
मृणालच्या चाहत्यांनी देखील तिचे फोटो पाहून तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. अभिनेता आदिनाथ कोठारेने मृणालच्या फोटोवर केलेली कमेंट लक्ष वेधून घेत आहे.
सध्या मृणालचा 'सीता रामम' सिनेमा थिएटरमध्ये धमाका करताना दिसतोय. बोललं जात आहे की मृणालचा हा सिनेमा सुपरहिट झाला आहे.
मराठमोळ्या मृणालनं मालिकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आज बॉलीवूडच्या उभरत्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं.