मुंबईचे डब्बेवाले ब्रिटनच्या प्रिन्सचा करणार पुणेरी पगडीने सन्मान

सकाळ डिजिटल टीम

ब्रिटनमध्ये सध्या प्रिन्स चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरु आहे.

Mumbai Dabbawala | esakal

ब्रिटनच्या राजघराण्यासोबत मुंबईच्या डब्बावालाचं खास नातं आहे.

Mumbai Dabbawala | esakal

त्यामुळे प्रिन्स चार्ल्सच्या राज्यभिषेक सोहळ्यात मुंबईचे डब्बेवाले प्रिन्स चार्ल्सला पुणेरी पगडी गिफ्ट करणार आहे.

Mumbai Dabbawala | esakal

पुणेरी पगडीला पुण्यात आणि महाराष्ट्रात सन्मानाचे प्रतीक मानले जाते. 

Mumbai Dabbawala | esakal

डबेवाले ही पगडी प्रिन्सला देऊन त्यांना सन्मान करणार आहे.

Mumbai Dabbawala | esakal

या डब्बेवाल्यांना प्रिन्स चार्ल्सच्या राज्याभिषेकाचे निमंत्रणही देण्यात आले आहे.

Mumbai Dabbawala | esakal

येत्या ६ मेला हा राज्यभिषेक सोहळा पार पडणार आहे.

Mumbai Dabbawala | esakal

प्रिन्स चार्ल्स ज्यावेळी भारतात आले तेव्हा त्यांनी मुंबईतील डब्बावाल्यांची भेट घेतली होती.

Mumbai Dabbawala | esakal

गेल्या वर्षी जेव्हा राणी एलिझाबेथ यांचे निधन झाले त्यावेळीही डब्बावाल्यांनी मुंबईत शोकसभा घेतली होती.

Mumbai Dabbawala | esakal

त्यामुळे मुंबईच्या डब्बेवाले आणि ब्रिटीश राजघराणे यांच्यातील सलोख्याचे नाते वारंवार दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Dabbawala | esakal