हिस - (2010)
मल्लिकाच्या भूमिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. एका हॉलीवूडच्या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेल्या या बॉलीवूडपटात इरफान खान, दिव्या दत्ता यांच्याही भूमिका होत्या.
जानी दुश्मन - (2002)
तीन तासांच्या या चित्रपटांवर खूप टीका झाली होती. प्रचंड खर्च करुन तयार केलेल्या जानी दुश्मनला प्रेक्षकांनी साफ नाकारले. राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात सनी देओल, अरमान कोहली, मनिषा कोईराला, अक्षय कुमार यांच्या भूमिका होत्या.
दुध का कर्ज - (1990)
अशोक गायकवाड यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यात जॅकी श्रॉफ, अमरीश पुरी, नीलम कोठारी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
नगिना - (1986)
सापांवर आधारित जे चित्रपट आहेत त्यात सर्वाधिक लोकप्रिय असणारा चित्रपट म्हणून नगिनाचे नाव घेतले जाते. त्यामध्ये श्रीदेवी, ऋषी कपूर, अमरीश पूरी यांच्या भूमिका होत्या.
शेषनाग - (1990)
के आर रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेला शेषनाग त्यावेळी सर्वाधिक चर्चेत होता. त्यात जितेंद्र, ऋषी कपूर आणि मंदाकिनी यांच्या भूमिका होत्या.
निगाहे - (1989)
सनी देओलच्या भूमिकेचे निगाहेमधून कौतूक झाले होते. त्याच्या जोडीला श्रीदेवी होती. अनुपम खेर यांच्या भूमिकेनं लक्ष वेधून घेतलं होतं.
नागिन - (1954)
सर्वाधिक जुना सर्पांवर आधारित चित्रपट म्हणून नागिनचा उल्लेख केला जातो. नंदलाल जसवंतीलाल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये वैजयंतीमाला यांची प्रमुख भूमिका होती.