निया शर्माची नव्यानं ओळख करुन देण्याची काही गरज नाही.
तिचं नावं सध्याच्या तरुणाईला चांगलचं माहिती आहे.
सोशल मीडियावर आपल्या बोल्ड अंदाजासाठी निया नेहमीच ओळखली जाते.
गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आली आहे.
सध्या तिचा एक व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे.
त्यामध्ये तिचा अवतार आहे त्यामुळे ती ट्रोल होताना दिसत आहे.
नियाचा तो वेष इतका बेढब आहे की, तिला नेटकऱ्यांनी तू अशी वेड्यासारखी का करतेस असा प्रश्न विचारला आहे.
आपण ट्रोल होतो की काय हे लक्षात आल्यावर तिनं लागलेच दुसरं फोटोशूट शेयर केलं आहे.