ईडी म्हणे, निक्कीनं घेतली तीन लाखांची कॅश!

| Sakal

प्रसिद्ध अभिनेत्री निक्की तांबोळी ही सुकेश चंद्रशेखर प्रकरणात चर्चेत आली आहे. तिची ईडीनं चौकशी केली आहे.

| Sakal

निक्की ही दोनशे कोटींच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुकेश चंद्रशेखला भेटायला तिहार जेलमध्ये गेली होती. ही बाब समोर आली आहे.

| Sakal

सुकेशकडून निक्कीनं तीन लाख रुपयांची कॅश आणि गुची या ब्रँडेड कंपनीची बॅग खरेदी केल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

आतापर्यत सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलीन फर्नांडिझ, नोरा फतेही या बडया अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत.

| Sakal

ईडीनं केलेल्या चौकशीत निक्कीच्या बाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

| Sakal

दिवसेंदिवस सुकेश चंद्रशेखर मनी लॉड्रिंग प्रकरण वेगळ्या प्रकारे समोर येताना दिसत आहे. त्यात होणारे खुलासे चाहत्यांना काळजीत टाकत आहेत.

| Sakal

निक्की तांबोळीच्या सुकेशच्या भेटीनं पुन्हा एका वेगळ्या चर्चेला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

निक्की शिवाय चाहत खन्ना, सोफिया सिंग आणि अरुषा पाटील यांनी सुकेशची जेलमध्ये भेट घेतल्याचे ईडीनं म्हटले आहे.

| Sakal