निम्रत कौरविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
ज्यांनी लंच बॉक्स पाहिला असेल त्यांना निम्रत कोण हे नव्यानं सांगण्याची गरज नाही.
बॉलीवूडमध्ये निम्रतचा चाहतावर्ग मोठा आहे. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही तितकाच जोरदार असल्याचे दिसून आले आहे.
यापूर्वी देखील निम्रतनं शेयर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय होता.
आता निम्रतचा वेगळा लुक तिच्या बोल्डनेसची साक्ष पटवून देणारा आहे.
निम्रतला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ती सध्या बॉलीवूडच्या एका प्रोजेक्टमध्ये सहभागी आहे.
दसवी या चित्रपटामध्ये निम्रतनं तर थेट अभिषेक बच्चनसोबत महत्वाची भूमिका बजावली होती.
येत्या काळात अनेक मोठे प्रोजेक्ट करत आपल्या नावावर बिग बॅनर चित्रपटांची नोंद करण्याचा निम्रतचा मानस असल्याचे दिसून आले आहे.