जायफळ पावडर, लिंबाचा रस, दही यांचे घट्ट मिश्रण १५-२० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा व नंतर धुआ.
जायफळमुळे चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल निघून जाते व त्वचा निरोगी राहाते.
जायफळ आणि दालचिनी यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग निघून जातात.
जायफळ पावडर आणि एलोवेरा जेल लावल्यास डार्क सर्कल्स निघून जातात.
जायफळमुळे चेहरा उजळतो.
खाज आणि पुरळ आल्यास जायफळचे तेल लावावे.
जायफळचा लेप लावल्याने मृत त्वचा निघून जाते.
कोणतंही घरगुती औषध लावताना पूर्ण चेहऱ्यावर लावण्याआधी त्वचेच्या छोट्याशा भागाला लावून बघा.