बॅगा भरा! ऑक्टोबरमध्ये सुट्टयांचा महापूर

सकाळ डिजिटल टीम

ऑक्टोबर 2022 मध्ये अनेक सण उत्सव येत असल्याने या महिन्यात भरपूर सुट्ट्या येत आहेत.

त्यामुळे तुम्ही या काळात फॅमिली मेंबर्स, मित्र किंवा पार्टनरसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

ऑक्टोबरची सुरुवातच सुट्ट्यांनी होत असून, यामुळे बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. यात अनेक लाँग विकेंडदेखील येत आहे.

ऑक्टोबर महिना 31 दिवसांचा असून, याकाळात 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची कामं आताच उरकून घ्या.

4 तारखेला नवमी आणि 5 ऑक्टोबरला दसरा आहे. या दिवशी बँकांचे कामकाज बंद असणार आहे.

8 ऑक्टोबर रोजी दुसरा शनिवार आणि 9 तारखेला रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत.

13 ऑक्टोबर रोजी करवा चौथ तर 14 ऑक्टोबरला ईज-ए-मिलाद-उन-नबी असल्याने बँका बंद असणार आहेत.

22 ते 26 ऑक्टोबरदरम्यान, दिवाळीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे या काळात बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी शेवटचा रविवार आणि त्यानंतर 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. यादिवशी रांची, पटना आणि अहमदाबाद येथील बँका बंद राहणार आहेत.

ऑक्टोबरमध्ये 22 ते 26 दिवाळीची सुट्टी असल्याने आणि त्यानंतर दोन दिवसांची सुट्टी टाकल्यास तुम्ही आठवडाभर फिरण्याचा प्लॅन करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.