संत्र्याची साले आरोग्यासाठीच नव्हे तर सौंदर्य वाढवण्यासाठीही उपयुक्त आहेत.
संत्र्याच्या सालीचाही त्वचेला आणि केसांना फायदा होतो.
संत्र्याच्या सालीमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा भरपूर असते.
संत्रीची साल सुकवून घ्या आणि त्याचे पावडर तयार करा या पावडरमध्ये मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.
त्वचा तेलकट असल्यास एका वाटीमध्ये संत्र्याच्या सालींची पेस्ट आणि चंदन पावडर एकत्र करून चेहऱ्याला लावा.
नैसर्गिक चमक येते आणि त्वचेवरील रोमछिद्रांची खोलवर स्वच्छता होते.
त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासाठी संत्र्याची ताजी साल आपण आपल्या कोपर, गुडघे आणि मानेवर रगडा.
त्वचेवर नैसर्गिक तेज येईल आणि त्वचा सैल देखील पडणार नाही. तसंच मुरुम आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते.