Oscar Award : उत्कृष्ट अभिनेत्रीचा 'ऑस्कर' पटकावणारी कोण आहे मिशेल?

सकाळ डिजिटल टीम

Oscar 2023 Michelle Yeoh : 60 वर्षीय मिशेल योहनं अनेक हिट चित्रपट दिलेत. मिशेल योहला 95 अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळालाय.

मिशेल योहला 'Everything Everywhere All At Once' या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

मिशेल योह ही जगातील सर्वोत्तम अॅक्शन अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं 1990 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

मिशेलला 'Everything Everywhere All At Once' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला 7 श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकणारी मिशेल योह ही पहिली आशियाई महिला आहे.

ऑस्कर स्वीकारताना मिशेल योह प्रचंड भावूक झाली. ती म्हणाली, “माझ्यासारखे दिसणारे सर्व तरुण मुले आणि मुली आज रात्री मला जे पहात आहेत, त्यांच्यासाठी हा आशा आणि शक्यतांचा किरण आहे. मोठी स्वप्नं पाहा आणि हो स्वप्नं खरी ठरतात.”

मिशेलनी तिला मिळालेला हा पुरस्कार आपल्या ८३ वर्षाच्या आईला समर्पित केला आहे. याआधी मिशेल योहला गोल्डन ग्लोब पुरस्कारानेही सन्मानित केलं होतं. यावर्षी तिच्या या चित्रपटाला ११ नमांकनं मिळाली.

मिशेलचा जन्म 6 ऑगस्ट 1962 रोजी मलेशियातील Ipoh शहरात झाला. मिशेलचं वय 60 आहे. मात्र, या वयातही ती तरुण अभिनेत्रीसारखीच फिट दिसते.

मिशेल 1990 च्या दशकात चित्रपटांसाठी प्रसिद्ध झाली. पीपल मॅगझिननं 1997 मध्ये जगातील 50 सर्वात सुंदर व्यक्तींच्या यादीत मिशेल योहचाही समावेश केला होता.

मिशेलला 1997 मध्ये आलेल्या जेम्स बाँडच्या Tomorrow Never Dies चित्रपटातून सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. मिशेलला चिनी चित्रपट Crouching Tiger, Hidden Dragon साठीही देखील ओळखलं.

2008 मध्ये मिशेलला फिल्म रिव्ह्यू वेबसाइट Rotten Tomatoes द्वारे सर्व काळातील सर्वोत्कृष्ट अॅक्शन अभिनेत्री म्हणून निवडले गेलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oscar 2023 Michelle Yeoh