टॉलिवूड फिल्म आरआरआर ने भारतात नवा इतिहास रचला आहे.
ना़टू नाटू गाण्याला ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट गाणं म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
यावेळी सुपरस्टार राम चरण याची पत्नी उपासना कामिनीने सर्व लाइमलाइट घेतलं.
तिची खास डिझाइनची पांढरी सिल्क साडी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती.
हैद्राबादची फॅशन डिझायनर जयंती रेड्डी हिने ही साडी डिझाइन केली होती. रिसायकल मटेरियलपासून ही साडी बनवण्यात आली होती.
साडीची बॉर्डर हाताने तयार करण्यात आली होती. यासोबत तिने हाफ लेंग्थ स्लीव्ज ब्लाऊज घातलं होतं.
या सोबत तिने पोटली बॅग कॅरी केली होती, ती बॅग पण रिसायकल मटेरियलनेच बनवण्यात आली होती.
या साडीसोबत तिने घातलेली अॅक्सेसरीपण खासच होती.