पैठणी, हा शब्दच ऐकता बायकांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते.
प्रत्येक मराठी स्त्रीला आपल्याकडे पैठणी असावीच असं स्वप्न असतं.
स्त्रियांच्या या पैठणी प्रेमामुळे बऱ्याच सिनेमांमध्ये यावर गाणीसुध्दा झाली आहेत.
पैठणी मराठी संस्कृतीचं जणू प्रतिनीधीत्वच करते.
त्यात बाईचं सौंदर्य काही औरच खुलून येतं.
साडीचा भरजरी काठ अन् पदर बाईच्या सौंदर्यात भर घालते आणि तिची शालीनता भूरळ पाडते.
स्त्रीत्वाचं पुर्ण सौंदर्य खुलवणाऱ्या पैठणीला म्हणूनच महावस्त्र म्हटलं जातं.