हसत खेळणारी लहान मुलं शाळेत जाताना कधी कधी रडायला लागतात.
अशा परिस्थितीत कधीकधी पालकांना मुलाला आणि स्वतःला हाताळणे खूप कठीण होते.
सुरुवातीला प्रत्येक मूल शाळेत जाताना रडते. परंतु जर तुमचे मूल दररोज शाळेत जाण्यासाठी खूप जास्त किंवा वारंवार रडत असेल तर याचा अर्थ असा होतो की, मुलाला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचे आहे.
शाळेत मुले रडण्याची अनेक कारणे असू शकतात.अनेकवेळा मुलांना शाळेतील वातावरण आवडत नाही म्हणून ते शाळेत गेल्यावर रडायला लागतात.
अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्याला शाळेचे महत्त्व सांगून त्यांचा दृष्टिकोन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ते तुमचे ऐकतील.
शिक्षिका कडक असल्यासही मूल शाळेत जाण्यास टाळाटाळ करू लागते.
काही मुले दुसर्या मुलांमुळे शाळेत जाण्यास संकोच करतात, म्हणजे तुमच्या मुलाला दुसर्या मुलाकडून मारहाण होत असेल तरीदेखील ते शाळेत जातांना रडू शकते.