शरीराचा दुर्गंध घालवण्यासाठी आणि सुगंधाने फ्रेश वाटावं म्हणून डिओ किंवा परफ्युम वापरला जातो.
यासाठी डिओ थेट शरीरावर मारला किंवा लावला जातो.
डिओड्रंटमध्ये ट्रॅक्लोसन असल्याने दूर्गंध पसरवणारे किटाणू मरतात. डिओड्रंट मध्ये सुवासिक तेलाचे प्रमाण १० ते १५% असते.
आपली त्वचासुद्धा श्वास घेत असते. त्यामुळे डिओ फार काळा वापरल्याने स्कीन प्रॉब्लेम होऊ शकतात.
नैसर्गिक सुवासिक पदार्थांचे तेल बनवून ते तेल जाळून आजूबाजूची हवा सुवासित केली जात असत. ही पद्धत सोळाव्या शतकात खूप लोकप्रिय झाली.
पण हल्ला इथेनॉलमध्ये किंवा प्रक्रिया केलेल्या पाण्यात सुवासिक पदार्थांचे तेल मिसळून त्यापासून परफ्युम बनवला जातो.
परफ्युम दिर्घकाळ टिकतो. त्यात १५ ते २० टक्के सुगंधी तेलाचे प्रमाण असते.
जिथे जास्त घाम येतो त्या भागांवर डिओ थेट लावला जातो. तर परफ्युम कपड्यांवर किंवा मनगट, मानेवर मारला जातो.
तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जात असला तर डिओ आणि परफ्यूम दोन्ही वापरू शकतात. पण दोन्हीचा सुगंध पुरक असणे आवश्यक आहे.