घरात पाळीव प्राणी असल्यास थोडीफार अस्वच्छता पसरते. अशा वेळी काय कराल ?
तुमचा प्राणी बाहेरून येणार असल्यास दारात एक बारदान पसरवून ठेवा. त्याच्यावर त्याला पाय स्वच्छ करू द्या. तसेच पाणी आणि टॉवेलने त्याचे पाय स्वच्छ करा.
व्हाइट व्हिनेगरने कार्पेट स्वच्छ करा.
प्राण्याने विष्ठा केल्यास लगेच स्वच्छ करा.
घरात पीव्हीसी शीट्स पसरवून ठेवा.
प्राण्याला तुम्ही ज्या गादीवर झोपवता ती गादी रोज धुआ.
त्याने वापरलेली खेळणी गरम पाणी आणि शॅम्पूने धुआ.
त्यांचे घरभर पसरलेले केस व्हॅक्युम क्लीनर किंवा लिंट रोलरच्या मदतीने स्वच्छ करू शकता.