पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा फॅशन सेन्स ही कायमच चर्चेत राहणारी गोष्ट आहे.
त्यांचे कपडे कायमच चर्चेत असतात. थंडीच्या निमित्ताने तुम्ही मोदींचे हे लूक्स रिक्रिएट करू शकता.
फक्त कपडेच नव्हे, त्यांचे विविध लूक्सही लक्षवेधी असतात.
त्यांनी कोणताही नवा लूक केला की सोशल मीडियावर देशभरात त्याची चर्चा होणार हे ठरलेलंच.
कपडे कोणत्या पद्धतीचे, त्यांची किंमत किती याचा लगेचच शोध लावला जातो.
अनेकदा या कपड्यांच्या किमतीवर विरोधक त्यांच्यावर टीकाही करतात.
काही वर्षांपूर्वी त्यांच्या सूटवरुन टीका झाली होती. या सूटवर नरेंद्र दामोदरदास मोदी असं नावही विणण्यात आलं होतं.
पंतप्रधान मोदींच्या शालीही आकर्षक असतात.
या शालींची, त्यांच्या किमतींची चर्चा सातत्याने होत असते.
नुकतेच पंतप्रधान मोदी त्यांच्या आईला भेटायला गेले, तेव्हाची त्यांची शाल जवळपास १ लाख ७० हजारांची होती.
त्यावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे.
पण शाल परिधान करण्याची ही मोदींची पहिली वेळ नाही.
या आधीही मोदींनी अनेक आकर्षक शाली परिधान करत देशवासियांचं तिकडे लक्ष वेधलं आहे.
यातल्या अनेक शाली पश्मिना या लोकरीपासून बनलेल्या आहे.
ही काश्मीरमध्ये मिळणारी सर्वोत्तम लोकर मानली जाते.
ज्या राज्याची निवडणूक असेल, तिथे प्रचाराला किंवा दौऱ्याला जाताना, मोदी तिथला स्थानिक पेहराव, राहणीमान समजून घेतात.
त्याप्रमाणे ते आपला पोशाख ठरवतात. त्यामुळेच ते फॅशन आयकॉन ठरत आहेत.