पुण्याचे माजी महापौर स्कॉटलंडमधे: पाहा फोटो

| Sakal

मुरलीधर मोहोळ हे स्कॉटलंडमधील दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांकडून लढलेल्या आणि शहीद झालेल्या ब्रिटीश सैन्याचे अधिकारी आणि सैनिकांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारलेल्या कमांडो मेमोरियलला आज भेट दिली.

| Sakal

सैन्य प्रशिक्षण आणि कमांडो मेमोरियल असा परिसर भारावून टाकतो. मनाला उभारी देतो, असं म्हणत त्यांनी आपले फोटो ट्विटरवर अपलोड केले आहेत.

| Sakal

मुंबईहून लंडन आणि लंडनला मुक्काम करुन आपल्या पुणे जिल्ह्यापेक्षाही लोकसंख्येनं कमी असलेल्या स्कॉटलंडला पोहोचतोय.

| Sakal

स्कॉटलंडमधील सर्वात मोठं शहर म्हणजे ग्लासगो. सर्वात मोठं ते अर्थकारणाच्या आणि लोकसंख्येच्या अर्थानं. इथली लोकसंख्या पुण्याच्या लोकसंख्येच्या निम्म्याहूनही कमी आहे.

| Sakal

मुरलीधर मोहोळ सध्या स्कॉटलंडमध्ये आहेत. तिथल्या ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांना ते भेटी देत आहेत.

| Sakal

ब्रिटीशांच्या इतिहासाच्या पर्वाची साक्षही, असं म्हणत त्यांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

| Sakal

'हिरवे हिरवे गार गालिचे, हरीत तृणांच्या मखमालीचे' बालकवींच्या ओळींची आठवण करुन देणारी स्कॉटलंडच्या अद्भुत निसर्गाची ही दृश्यं शब्दशः थक्क करतात, असं म्हणत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.

| Sakal

 हेच शहर ब्रिटीश राजवटीच्या काळात इंग्रजांचं दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं शहर होतं. 

| Sakal