बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना वेडावून टाकणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पुजाचे नाव घ्यावे लागेल.
पुजा हेगडेनं गेल्या काही वर्षांपासून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर देखील पुजाच्या फोटोंनी नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे.
काही दिवसांपासून पुजा हेगडे आणि सलमान खान यांच्या अफेयरची चर्चा रंगली होती.
सलमान खान तिला डेट करत असल्याच्या बातम्यांनी नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण आले होते.
किसी का भाई किसी की जानमध्ये पुजा सलमानसोबत दिसणार आहे.
यापूर्वी पुजा रणवीर सिंगसोबत सर्कसमध्ये दिसली होती. तो चित्रपट फारसा चालला नव्हता.
कमी कालावधीत पुजानं आपल्या नावाची वेगळी ओळख बॉलीवूडमध्ये तयार केली आहे.