मराठी भाषा गौरवदिनी प्राजक्ता माळीने फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता फोटो शेअर करताना सुंदर असं कॉप्शन दिलं आहे. त्यामध्ये तिने लिहिले आहे की,...
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं..
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं…
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं..
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं…
कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी लिहिलेल्या ह्या ओळींसारखंच प्रेम आहे माझं, माझ्या “मराठीवर”…
जे आहे आज, राहील उद्या , परवा..मरणोत्तरही….. “मराठी भाषा गौरव दिनाच्या”; महाराष्ट्राला आभाळभर शुभेच्छा…