मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या चर्चेत आली आहे.
काही दिवसांपासून प्राजक्ता ही तिच्या वेगवेगळया पोस्टमधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
आता प्राजक्तानं तिच्या इंस्टावर शेयर केलेले फोटो नेटकऱ्यांना भावले आहेत.
त्या फोटोंना कॅप्शन देताना तिनं, कलेचं सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी वेदना उपयोगी पडते. असं म्हटलं आहे.
ते फोटो पाहताना नेटकऱ्यांचे, तिच्या चाहत्यांचे भान हरपले आहेत. त्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.
एकानं त्या फोटोंना सुंदर असे म्हणत प्राजक्ताच्या सौंदर्याचे कौतूक केले आहे.
प्राजक्तानं आता तिचा प्राजक्तराज या नावानं ज्वेलरी ब्रँड तयार केला आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो पाहणे आणि त्यावर कमेंट करणे हा तिच्या चाहत्यांचा आवडीचा विषय आहे.