प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतील तिच्या खास निवेदनामुळे नेहमीच चर्चेत असते.
प्राजक्ता माळी नुकतीच बेंगलोरला गेली होती. बेंगलोर आश्रममध्ये प्राजक्ताने हजेरी लावली होती.
विशेष गोष्ट म्हणजे बेंगलोर मध्ये गेल्यावर प्राजक्ताने तिच्या प्राजक्तराज चं खास कलेक्शन परिधान केलेलं
महाराष्ट्राबाहेर मराठी दागिने घालण्याची मजा काही औरच आहे, अशी भावना प्राजक्ताने शेयर केलीय
महाशिवरात्री निमित्त प्राजक्ता बेंगलोरमध्ये भगवान शंकराच्या आश्रमात गेली होती
तिथे हजारो लोकांच्या गर्दीत प्राजक्ताने सुद्धा भगवान शंकराची मनापासून आराधना केली
पांढऱ्या रंगाचा ड्रेस, त्यावर मॅचिंग ओढणी, कपाळावर गंध अशा खास लूकमध्ये प्राजक्ता लक्ष वेधून घेत आहे
प्राजक्ता माळी तिच्या खुमासदार शैलीत महाराष्टाची हास्यजत्रा या शोचं सूत्रसंचालन करत आहे