व्हॅलेंटाईन डे निमित्तानं प्राजक्ता माळीनं छान लाल साडीतले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
लाल रंगाच्या साडीत प्राजक्ता माळी नेहमीप्रमाणेच बोल्ड अॅन्ड ब्युटिफुल दिसत आहे.
साडीत वेगवेगळ्या पोझ देत प्राजक्तानं नेटकऱ्यांच्या नजरा आपल्यावरच खिळवून ठेवल्या आहेत.
फोटो सोबतच प्राजक्तानं त्या फोटोपोस्टला दिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे.
प्राजक्तानं फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की,'अखिल भारतीय single संघटनेचे सदस्य. तुम्ही एकटे नाही.., मी ही तुमच्यात सहभागी आहे..'
आता प्राजक्तानं व्हॅलेंटाईन डे रोजी आपलं स्टेटस सिंगल आहे जगजाहिर केल्यावर नेटकऱ्यांच्या त्यावर भन्नाट प्रतिक्रिया अपेक्षित होत्याच.
अनेकांनी ती सिंगल असलेल्यांचा संघटनेत सामिल झाल्यानं तिचं स्वागत केलं तर एकानं भन्नाट प्रश्न विचारत म्हटलं की,'तू गोरी मग सिंगल कशी काय?'