'ग्लासभर दूध अन् डिंकाचा लाडू'; प्रियाचा भन्नाट किस्सा

प्रणाली मोरे

प्रिया बापट म्हटलं की तिची उत्तम फिटनेस पहिल्यांदा डोळ्यासमोर येते.

Esakal

प्रिया अनेकदा आपले वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Esakal

प्रिया खाणार ते वजन कमी रहावं,वाढू नये यासाठी उपयुक्त ठरणारे पदार्थ. पण एक वेळ अशी आलेली की तिला ग्लासभर दूध आणि रोज एक डिंकाचा लाडू नियमित खावं लागत होतं.

Esakal

प्रिया बापट नुकतीत 'बस बाई बस' या कार्यक्रमात आली होती. आणि तिने अनेक मजेदार किस्से शेअर केलेत.

Esakal

प्रियानं यावेळी आपल्या वजनदार सिनेमाच्यावेळचा वजन वाढवायचा किस्सा शेअर केला. ज्यात तिनं ग्लासभर दूध आणि रोज डिंकाचा लाडू खाऊन आपण १६ एक किलो वजन वाढवलं असं बोलली.

Esakal

अर्थात जे पदार्थ फारसे आवडत नाहीत ते रोज नियमानं खाणं ही एक कसरत असते असं देखील प्रिया बापट त्यावेळी म्हणाली. वजन वाढवणं सर्वात कठीण हे तिनं खासकरुन नमूद केलं.

Esakal

प्रियानं 'वजनदार' सिनेमाच्या वेळेस वजन वाढवण्यासाठी मराठी कलाकारांचे फेव्हरेट फिटनेस ट्रेनर परुळेकर सर यांच्याकडून ट्रेनिंग घेतलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal