प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापटच्या सिटी ऑफ ड्रीम्सची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांना या मालिकेच्या तिसऱ्या सीझनचे वेध लागले होते.
प्रिया बापटनं या मालिकेत साकारलेली पौर्णिमा गायकवाडची भूमिका प्रेक्षकांना भलतीच आवडली होती.
प्रियानं साकारलेली महिला मुख्यमंत्री पदाची भूमिका कमालीची लोकप्रिय झाली. त्यावरुन प्रिया चर्चेत आली.
सध्या सोशल मीडियावर प्रियाचा व्हायरल झालेला तो लूक चाहत्यांना भावला आहे.
प्रियाच्या त्या फोटोवर नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी तिला दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.
एकानं तर काहीही झालं तरी आमची मुख्यमंत्री तूच राहणार आहेस, अशा शब्दांत प्रियाचं कौतूक केलं आहे.
याशिवाय आगामी काही प्रोजेक्टमधून प्रिया चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे.