खेड तालुक्यातील बहिरवाडी गावच्या भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रेक्षकांनी गौतमीच्या आदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला.
यावेळी काही तरुणांनी कार्यक्रमात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौतमी आणि आयोजकांना कार्यक्रम थांबविण्याची वेळ आली.
गावच्या महिलांनी अखेर दांडक्याने धुडगूस घालणाऱ्यां तरूणांना चांगलाच चोप दिला.
तरीही प्रत्येक गाण्यात तरुण धुडगूस घालत असल्याने गौतमीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आला आहे.
यावेळी गौतमी पाटीलच्या अदाकारीवर प्रेक्षक बेभान होऊन थिरकले.
गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालण्याचे प्रकार होत असताना गावच्या महिलांनीच धुडगूस घालणाऱ्यांना चोप दिला यावेळी पंचक्रोशीतील तरुणाईने मोठ्या संख्येने गर्दी केली.
दरम्यान गर्दीचा फायदा घेत काही तरुणांनी गोंधळ घालत धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला.