ती गालात हसली अन् पब्लिक पागल...

प्रणाली मोरे

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या प्रत्येक फोटोवरनं तिचा चाहतावर्ग जीव ओवाळून टाकतो. आता तर ती दक्षिणेत नाही तर बॉलीवूडकरांची देखील फेव्हरेट आहे.

Esakal

रश्मिका लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. पण सध्या तिची जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती 'पुष्पा- द रूल' मुळे.

Esakal

पुष्पा-द रूल चे शूटिंग सुरू झालं आहे. सिनेमाच्या पहिल्या भागानं तर जगभरातल्या प्रेक्षकांना वेड लावलं होत. त्यामुळे अर्थातच आता नव्या भागाविषयी उत्सुकता असणार यात नवल नाही.

Esakal

रश्मिकानं 'पुष्पा २' सिनेमाच्या मुहूर्ताच्या पूजेचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. चाहत्यांनी या फोटोवर भरपूर प्रेमाचा वर्षाव केला होता.

Esakal

'पुष्पा २' मध्ये बोललं जात आहे की रश्मिकाची 'श्रीवल्ली' भूमिका खूप वेगळी असणार आहे. आणि सिनेमातील तिच्या भूमिकेचं वजनही यावेळी वाढलं आहे. तर मध्ये एक बातमी समोर आली होती की 'पुष्पा २' मध्ये तिची भूमिका अर्ध्यातच संपेल. पण ही अफवा असल्याचं मेकर्सनी स्पष्ट केलं होतं.

Esakal

रश्मिकाच्या 'पुष्पा २' च्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीही तिच्या भूमिकेविषयी खूप अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

Esakal

आपल्या चाहत्यांना प्रतिक्रिया देताना रश्मिका म्हणाली आहे,''माझ्या 'पुष्पा २' मधील भूमिकेविषयी वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. पण ती नक्की कशी असेल हे सिनेमा रिलीज झाल्यावर कळेलच''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal