5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटकमधील विराजपेठ येथे रश्मीकाचा जन्म झाला
रश्मीकाने सायकॉलॉजी, जर्नालिझम आणि इंग्लिश लिटरेचर या विषयामध्ये पदवी संपादन केली आहे
एम एस रमेया कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स या कॉलेजमधून तिने पदवी शिक्षण पूर्ण केले आहे
क्लीन अँड क्लीअर या कंपनीद्वारे 2014 मध्ये क्लीन अँड क्लिअर फेस ऑफ द इयर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेची रश्मिका विजेती ठरली होती
कन्नड भाषेतील किरिक पार्टी हा रश्मिकाचा पहिला चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता
2017 मध्ये रश्मिकाने अंजानी पुत्रा आणि चमक या दोन कन्नड चित्रपटांमध्ये काम केले
2018 साली प्रदर्शित झालेल्या 'गीता गोविंदम' या चित्रपटामुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली.