भारताचा टॉप स्पीनर रविचंद्रन अश्विन याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या इंदौर येथील तीसऱ्या टेस्ट मॅचमध्ये आणखी एका रेकॉर्डला गवसणी घातली आहे.
अश्विनने माजी कर्णधार आणि महान ऑलराऊंडर कपिल देवचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे.
अश्विन यासोबतच सर्वात यशस्वी गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
अश्विनने भारतासाठ सर्वाधिक इंटरनॅशनल विकेट पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कपिल देवला मागे टाकलं आहे.
अश्विनच्या पुढे या यादीत आता हरभजन सिंह आणि अनिल कुंबळे हो दोघेच उरले आहेत.
अश्विनने आतापर्यंत ६८९ विकेट घेतले आहेत.
हरभजनने ७०७ विकेट तर अनिल कुंबळेने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ९५३ विकेट घेतले आहेत.
कपिल देव यांच्या नावावर ६८७ विकेट आहेत.
अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये ४६६, वनडेमध्ये १५१ तर टी-२० क्रिकेटमध्ये ७२ विकेट्स घेतले आहेत.