चहा हा प्रत्येकाचा आवडता आहे पण तुम्हाला माहिती आहे का अति चहा पिणे आपल्यासाठी घातक ठरू शकतं.
अति चहा पिण्याचे बरेच नुकसान आहे.
चहा पिल्याने त्यातील कॅफिनमुळे आपली मेंदूची शक्ती कमकुवत होते.
गरम चहा पोट आणि घशालाही त्रासदायक असतो.
जास्त चहा प्यायल्याने वारंवार लघवी होते, त्यामुळे शरीरातील महत्त्वाचे घटक पोटॅशियम, मॅग्नेशियम बाहेर पडतात आणि शरीरात अशक्तपणा येतो.
याशिवाय अति चहा पिल्याने अन्ननलिका आणि घशाचा कॅन्सर होण्याचीही शक्यता वाढते.
इराणमधील अन्ननलिकेचा कर्करोग असलेल्या रुग्णांवर केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहेत
याशिवाय जे पुरुष दिवसातून 7 कपपेक्षा जास्त चहा पितात त्यांना प्रोस्टेट कर्करोगाचाही धोका असतो.
सोबतच अति चहा पिल्याने ब्लड प्रेशर वाढण्याचीही शक्यता असते.
त्यामुळे चहा लिमिटमध्ये पिलेलाच बरा.