तुमच्यासाठी हे जाणून घेणे फार गरजेचे असते की तुमचा पार्टरनर टॉक्झिक आहे की केयरींग आहे, तुमचा पार्टनर टॉक्झिक असल्यास तुमचं जीवन उध्वस्त होऊ शकतं.
रोज कितीतरी धक्कादायक घटना पुढे येतात ज्यात पार्टनरच्या संशयास्पद वृत्तीमुळे मुलींचा जीव जातो.
तुमचा पार्टनर टॉक्झिक आहे की नाही याची ओळख करून घेणेही महत्वाचे आहे. नाहीतर तुम्ही भविष्यात गंभीर संकंटात पडू शकता.
जर तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक मित्रावर संशय घेत असेल तर समजून घ्या की तुम्ही टॉक्झिक पार्टनरसह रिलेशनमध्ये आहात.
जर तुमची पार्टनरसोबत रोज भांडणं होत असतील तर तुम्ही चुकीच्या नात्यात अडकलाय.
जर तुमच्या पार्टनरसोबत तुमचे रोज झगडे होत असतील तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास तसेच मानसुद्धा नाही.
तुमचा पार्टनर तुम्हाला जीवे मारण्याची धमकी देत असेल तर हे नातं प्रेमाचं नसून घृणेचं आहे असं म्हणायला हरकत नाही.
प्रेमात एकमेकांचा आदर फार महत्वाचा असतो मात्र तुमच्या नात्यात आदर नसेल तर चुकीच्या नात्यात आहात.
तुमचा पार्टनर तुमच्यावर कंट्रोल करण्यचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही अशा रिलेशनशिपमध्ये राहायला नको.