हल्ली लग्नाआधी रिलेशनशीपमध्ये असणं फारच कॉमन आहे.
रिलेशनशीप एक्स्पर्ट म्हणतात की, लग्नाआधीच जोडिदाराला पास्ट विषयी सांगावं. त्यामुळे तुमचा प्रामाणिकपणा दिसतो.
आपला पास्ट कोणासमोर मांडायचा याचा फार विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असतं.
लोक एरवी फार मॉर्डन असतात. पण पार्टनरच्या एक्सचा विषय येतो तेव्हा जजमेंटल होतात.
पहिले आपल्या पार्टनरला समजून घेत ओळखा, मग त्याच्या समोर पास्टचा विषय काढा.
पहिल्याच भेटीत एक्स विषयी कधीही सांगू नये. ही भेट एकमेकांना जाणून घेण्यासाठी आहे, एक्सविषयी बोलण्यासाठी नाही.
जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा पार्टनर पास्ट ऐकून घेऊ शकतो तर फक्त ओव्हर व्हियू द्या. डिटेल्स सांगू नका. ते पार्टनरला अनकंफर्टेबर करू शकेल.
जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा पार्टनर समजूतदार आहे, तर काही हायलाइट्स सांगू शकतात. पण यातून सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नका.