भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा शुक्रवारी (३० डिसेंबर) अपघात झाला.
ऋषभ पंत आपल्या आईला भेटण्यासाठी घरी जात असताना वाटेत त्याच्या कारला अपघात झाला आणि या अपघातातून थोडक्यात बचावला.
ऋषभ पंतच्या आईचे नाव सरोज पंत आणि वडिलांचे नाव राजेंद्र पंत आहे.
ऋषभ पंतचे वडील राजेंद्र पंत यांचे 2017 मध्ये निधन झाले.
वडिलांच्या मृत्यूनंतर पंतच्या आईने त्याला क्रिकेटर बनण्यास मदत केली.
ऋषभ पंतचे वडील राजेंद्र पंत हे खाजगी शाळा चालवायचे.
पंतमधील क्रिकेटबद्दलचे समर्पण वाढवण्यात त्याच्या वडिलांचे मोठे योगदान आहे.
पंतने 1 फेब्रुवारी 2017ला आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले,
जेव्हा त्याला टी-20 मध्ये भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली.