टेनिस इतिहासातील एक महान खेळाडूंमध्ये रॉजर फेडररचे स्थान अव्वल आहे.
रॉजर फेडरर टेनिस कोर्टवरील पाच ऐतिहासिक कामगिरींमुळे महान झाला आहे.
फेडरर सर्वाधिक आठवडे ATP रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. त्याने सलग 237 आणि एकूण 310 आठवडे पहिले स्थान सोडले नव्हते.
रॉजर फेडरर हा सलग पाचवेळा युएस ओपन जिंकणारा या पृथ्वीतलावरील एकमेव टेनिसपटू आहे. फेडररने 2004 ते 2008 अशी सलग पाच वर्षे युएस ओपन टायटलच्या जवळपास कोणाला फिरकू दिले नाही.
1968 पासून 2022 पर्यंत सर्वाधिकवेळा विम्बल्डवरच्या ट्रॉफीवर फेडररचेच किस आहेत. त्याने तब्बल 8 वेळा विम्बल्डवर नाव कोरले.
विम्बल्डन जिंकण्यातही फेडररने कमालीचे सातत्य दाखवले. त्याने 2003 पासून 2007 पर्यंत सलग पाचवेळा विम्बल्डन आपल्या कवेत घेतलं.
रॉजर फेडरर हा सर्वात पहिल्यांदा 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरूष टेनिसपटू ठरला.