ऋतुजा बागवे सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते.
ती नेहमी सोशल मीडियावर आपले स्टायलिश अंदाजातले फोटो शेअर करताना दिसते.
एरव्ही मालिकांमधून सोज्वळ भूमिका करणारी ऋतुजा बागवे प्रत्यक्ष आयुष्यात मात्र भलतीच बोल्ड आहे हे फोटोंवरनं कळतं बरं का.
मालिकाविश्वात रमलेली ऋतुजा बागवे सिनेमांतूनही आपली चमक दाखवताना दिसते आहे.
प्राजक्ता माळीसोबत एकत्रित काम केलेल्या एका सिनेमात ऋतुजा बागवेनं लेस्बियन मुलीची व्यक्तीरेखा साकारली होती.
प्राजक्ता माझी लेडी क्रश आहे असं म्हटल्यानं त्यावेळी ऋतुजा बागवे चर्चेतही आली होती.
ऋतुजा बागवेनं नुकताच एक बीचवरचा फोटो पोस्ट केला आहे. जो पाहून चाहत्यानं तिला थेट डेटला यायला आवडेल का माझ्यासोबत असा सवाल केला आहे.