चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि महाराष्ट्राचा अष्टपैलू फलंदाज ऋतुराज गायकवाडने आज इतिहास रचला.
विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये ऋतुराज गायकवाडने आज तुफान बॅटिंग केली.
महाराष्ट्र संघाचा कॅप्टन असलेल्या ऋतुराजने उत्तर प्रदेश विरुद्ध डबल सेंच्युरी केली आहे.
ऋतुराज गायकवाडने पहिल्यांदाच २ शतके ठोकली आहेत.
ऋतुराजने 159 चेंडूत 220* धावांची नाबाद खेळी खेळली ज्यात त्याने 10 चौकार आणि 16 षटकार मारले.
ऋतुराज गायकवाडने आणखी एक विक्रम केला. त्याने उत्तर प्रदेशचा फिरकी गोलंदाज शिवा सिंगला एका षटकात 7 षटकार ठोकले.
उत्तर प्रदेशच्या संघाकडून शिवा सिंहने 49 वी ओव्हर टाकली होती.
याआधी जेम्स फुलरच्या नावावर हा रेकॉर्ड होता. ज्याने एका ओव्हरमध्ये 38 धावा दिल्या होत्या.