Sai Pallavi : साई चक्क आठ भाषा बोलते!

सकाळ डिजिटल टीम

दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून साई पल्लवीचे नाव घेतले जाते.

आज साईचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्या लाखो चाहत्यांनी साईला बर्थ डे च्या खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

साई ही मल्टिटँलेंटेड आहे. तिला आठ भाषा बोलता येतात. त्यामध्ये मल्याळम, तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड, इंग्रजी, बंगाली आणि फ्रेंच भाषेचा समावेश आहे.

साईचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

साईनं मिडल क्लास अब्बाय, मारी २, लव स्टोरी आणि श्याम सिंघा रॉय सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

साई ही कधीही तिच्या चेहऱ्यावर कॉस्मेटिक प्रॉडक्टचा वापर करत नाही. यासाठीच की काय तिला एका ब्युटी प्रॉडक्टची आलेली दोन कोटींची ऑफर तिनं नाकारली होती.

ब्युटी प्रॉडक्टच्या माध्यमातून लोकांमध्ये विशेषत महिलांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे साईचे म्हणणे आहे.

साईची लोकप्रियता आता जगभरात सगळीकडे आहे. २०१७ मध्ये तिचा फिदा नावाचा चित्रपट आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Pallavi